वणीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

काढण्यात आली भव्य मिरवणूक, समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात माळी समाज संघटनेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शनिवार, दि. 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी माळी पुरा येथे संघटनेच्या अध्यक्षा रिंकू मोहुर्ले, उपाध्यक्षा प्रीती गुरनुले, सचिव रेखा रासेकर, सहसचिव जया सोनुले व कोषाध्यक्षा नंदाबाई शेंडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यानंतर शहरात नयनरम्य व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. माळी पुरा येथून सुरू झालेली ही मिरवणूक खाती चौक, गांधी चौक, गाडगे बाबा चौक, सर्वोदया चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाली. ढोल-ताशांच्या गजरात, आकर्षक पोस्टर्स व घोषणांनी सजलेली ही रॅली समाजबांधवांच्या उत्साहाने रंगली.

कार्यक्रमास माळी समाज संघटनेचे प्रविण निकोडे (अध्यक्ष), चंदन मोहुर्ले, दशरथ निकोडे, संदीप वाढई (उपाध्यक्ष), अ‍ॅड. अमोल बोरूले (सचिव), पवन गाऊत्रे (सहसचिव), नितीन मांदाडे (कोषाध्यक्ष) यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विद्या मांदाडे, माधुरी चौधरी, लक्ष्मीताई पाटील, उषाताई डुकरे, अरुणा जाधव, शीतल शेंडे, पूजा दानव, विद्या निकोडे, अर्चना मोहुर्ले, प्रीती गुरनुले, आशा शेंडे, सुरेंद्र चौधरी, हर्षल शेंडे, पिसाराम वाढई, प्रशांत वाढई, बंडू वाढई, बंडू गुरनुले, गजानन बोरूले, प्रमोद निकुरे, नथुजी चौधरी आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याप्रसंगी वक्त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व स्त्रीसशक्तीकरणाच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी स्त्री शिक्षणाला दिलेला प्राधान्यक्रम, समाजातील अंधश्रद्धांविरुद्ध उभारलेला लढा आणि स्त्री-पुरुष समानतेसाठी केलेले प्रयत्न यांचा उल्लेख करून उपस्थितांना प्रेरित केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर भोजनाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित समाजबांधवांनी एकत्र येऊन सावित्रीबाईंच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.

 

Comments are closed.