वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन

३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता माळीपुरातून मिरवणुकीस प्रारंभ; शहरातील प्रमुख मार्गांवरून होणार मार्गक्रमण

भूषण आदे, वणी: भारताच्या पहिल्या शिक्षिका, स्त्री-शिक्षणाच्या प्रणेत्या व सामाजिक परिवर्तनाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता वणी शहरात भव्य जयंती उत्सव व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात माळीपुरा, वणी येथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून होणार असून, त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सदर मिरवणूक माळीपुरा येथून खाटी चौक, गांधी चौक, गाडगे बाबा चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक व टिळक चौक मार्गे काढण्यात येणार आहे. टिळक चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मिरवणुकीची सांगता माळीपुरा येथे होणार आहे.

मिरवणुकीनंतर माळीपुरा येथे सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या जयंती सोहळ्यास नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हा कार्यक्रम माळी समाज संघटना, वणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

                                                                             आयोजक :- माळी समाज संघटना, वणी

Comments are closed.