शिवराय चषक स्पर्धेत वणीचा पदकांचा पाऊस

34 विद्यार्थ्यांनी मिळवले तब्बल 68 पदके

बहुगुणी डेस्क, वणी : शिवराय चषक सिलम्बंब महाराष्ट्र स्टेट लेवल चॅम्पियनशिप 2025 मध्ये वणीच्या शिव आनंद बहुउद्देशीय संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तेजस्विनी राजु गव्हाणे यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी केली.

दि. 15 ते 16 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे पार पडलेल्या या स्पर्धेत स्टिक रोलिंग, वेपॉन रोलिंग, स्टिक फाईट व डबल स्टिक प्रकारात वणीच्या 34 चिमुकल्यांनी तब्बल 68 पदके पटकावली. यात 33 सुवर्ण, 28 रौप्य व 7 कांस्य पदकांचा समावेश असून वणीला सर्वाधिक पदके मिळविण्याचा मान मिळाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या यशामागे शिव आनंद बहुउद्देशीय संस्था व रॉयल फाउंडेशनच्या उपक्रमांबरोबरच सदैव समाजसेवेत असलेले राजु देवराव गव्हाणे यांचे मार्गदर्शन आणि युवा प्रशिक्षक तेजस्विनी गव्हाणे यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले. महिला सक्षमीकरणासाठी तेजस्विनी गव्हाणे चिमुकल्यांना मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देत असून त्यातून अनेक विद्यार्थी उज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहेत.

स्पर्धेत तेजस्विनी गव्हाणे यांनी अंडर-19 गटात 2 सुवर्ण पदके व प्रशिक्षक ट्रॉफी मिळवली. तसेच विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके मिळवत वणीचा झेंडा उंचावला.

Comments are closed.