कडवट शिवसैनिक महेश सोमलकर युवासेना तालुका प्रमुखपदी

20 वर्षांपासून सक्रिय कार्यरत असलेल्या सोमलकर यांना नवी जबाबदारी

विवेक तोटेवार, वणी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने गुरुवार (5 मार्च) रोजी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून महेश सोमलकर यांची युवासेना वणी तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नियुक्तीमुळे वणी परिसरासह सावर्ला गावात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Birthday

महेश सोमलकर हे व्यावसायिक असून मातोश्री ट्रेडर्स नावाने त्यांचे व्यावसायिक प्रतिष्ठाण आहे. गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेत सक्रियपणे कार्यरत आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी पक्षकार्याला सुरुवात केली होती. कट्टर शिवसैनिक म्हणून परिसरात त्यांची ओळख असून प्रत्येक निवडणुकीत ते वेळ काढून पक्षाच्या प्रचार व संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेत आले आहेत. शिवसेनेत फूट पडल्याच्या काळातही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

महेश सोमलकर यांची 2007 साली सावर्ला येथे शिवसेना शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2013 मध्ये युवासेना उपतालुका प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. या काळात त्यांनी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. परिसरात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या काळात त्यांनी पूरग्रस्तांना मदत करत राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. या सामाजिक कार्यामुळे वणी परिसरात त्यांची ओळख अधिक मजबूत झाली आहे.

ते कडवट शिवसैनिक व माजी पंचायत समिती सभापती दिवंगत बाळू सोमलकर हे त्यांचे मोठे भाऊ होते. यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकीय कार्याची सुरुवात केली. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून त्यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नियुक्तीनंतर बोलताना महेश सोमलकर यांनी या जबाबदारीचे श्रेय आमदार संजय देरकर आणि जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांना दिले. त्यांच्या या निवडीमुळे वणी तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

Comments are closed.