विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या; परिसरात खळबळ

का संपवली तरुणाने जीवनयात्रा?

विवेक तोटेवार, वणी : बोर्डा येथील 33 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव राजेंद्र विलास दुर्वे (वय 33, रा. बोर्डा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तो घरातून बाहेर पडला. घराचा दरवाजा बाहेरून लावून त्यांनी जवळील विहिरीत उडी घेऊन जीवन संपविल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, राजेंद्र यांना काही दिवसांपासून झोप न येण्याचा त्रास होत होता. मानसिक तणावामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता.

शवविच्छेदनानंतर रविवारी सकाळी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Comments are closed.