वणी येथे स्माईल फाउंडेशन महिला समिती स्थापन

महिला सक्षमीकरणासाठी स्माईल फाउंडेशनचा नवा उपक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: वणी व परिसरात शिक्षण, पर्यावरण संवर्धन, दिव्यांग व अनाथ मुलांचे सक्षमीकरण तसेच शेतकरी आत्महत्या प्रतिबंध या क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्माईल फाउंडेशनच्या वतीने वणी येथे महिला समितीची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या ठरावानुसार स्थापन करण्यात आलेल्या या समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या बैठकीत समितीची अधिकृत घोषणा करण्यात आली. बैठकीस संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Birthday

समितीच्या अध्यक्षपदी डॉ. प्रणाली दुमोरे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी अर्चना पिदुरकर, सचिवपदी स्नेहलता चुंबळे, उपसचिवपदी कल्पना चिडे यांची निवड झाली आहे. ज्योती नगरवाला व वसंति ठक्कर यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच संतोषी ताजने, राधा दरेकर, नीता काळे, प्रिया कोचेता, प्रियाल कोचेता, वंदना आत्राम, पुष्पा जाधव व वैशाली नोमुलवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

महिला सक्षमीकरण, आरोग्य जनजागृती शिबिरे, शैक्षणिक मार्गदर्शन, पर्यावरण मोहिमा तसेच गरजू महिला व विद्यार्थ्यांना मदत असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. समाजहितासाठी सर्व सदस्य समन्वयाने कार्य करतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

Comments are closed.