वणीचे खड्डे अडकले दोन ठेकेदारांच्या भांडणात

ग्राहक प्रहार संघटनेची जिल्हाधिका-यांकडे तक्रार

0

जब्बार चीनी, वणी: वेकोलिच्या फंडातून 5 कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या वरोरा चौफुली ते चिखलगाव पर्यतच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून हे खड्डे अर्धवट बुजवुन सोडुन दिल्याची तक्रार ग्राहक प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Podar School 2025

या खड्याबाबत याअगोदरही तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीवरून प्रशासनाला जाग आली व सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्याची पाहणी करत खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले. अर्ध्याअधिक खड्डे बुजवलेही पण त्याच्यावर रोलर फिरवण्या पूर्वीच वणीतील एका ठेकेदाराने हे काम बंद करायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन ठेकेदारामध्ये जुन्या पैशाचा वाद सुरू असल्याने या वादात अनेक खड्डे बुजवायचे राहीले, तसेच जे खड्डे बुजवण्यात आले आहे त्यावर रोलर फिरवण्यात आले नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...


आमदार काय निर्णय घेतात?
खड्यांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताची शक्यता असते. पावसाळ्यात ही शक्यता अधिक वाढते. मात्र दोन ठेकेदारांच्या भांडणामुळे लोकांचा जीव धोक्यात आला आहे. अखेर हा प्रश्न आमदारांच्या समोर ठेवण्यात आला आहे. पोलीस संरक्षणात हे खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. आता आमदार हे खड्डे बुजवण्यासाठी किती तत्परतेने कार्य करतात याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.

निवेदनावर ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम, जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर, जिल्हा संघटक बंडूभाऊ लवटे, जिल्हा कार्याध्यक्ष दामोधर बाजोरीया, उपाध्यक्ष यशवंत काळे, कोशाध्यक्ष सुनील धवने सहसचिव भैय्यासाहेब ठमके, सल्लागार प्रमुख हंमनतु रजनलवार, राजेंद्र उपलेंचवार, पाटनबोरी सर्कल प्रमुख जयवंत बावणे, झरी जामनी सर्कल प्रमुख मनोज गेडाम, राळेगाव सर्कल प्रमुख दिलीप वाढई, आर्णीचे अध्यक्ष शेख सत्तार शेख रज्जाक, मारेगाव सर्कल प्रमुख सचिन मेश्राम, शिबला सर्कल प्रमुख धनराज तिरमनवार, अभय निकोडे, वणीचे विनोद कुचेरीया, प्रदीप भानारकर, पंकज नेहारे, आनंद नक्षणे, अजय दुमनवार आदींच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.