शेतकरी मंदिर परिसरात पाणी पुरवठा ठप्प, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

जेसीबीने नालीसाठी खोदकाम करताना साईमंदिर जवळील पाईपलाईन फुटली

तालुका प्रतिनिधी, वणी: साई मंदिर परिसरात नाली बांधकाम करण्यासाठी जेसीबीने खोदकाम केले जात आहेत. हे काम सुरू असताना यात मार्गात येणारी घरगुती पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. याचा शेतकरी मंदिर परिसरातील रहिवाशांना फटका बसला असून यामुळे घरगुती पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. रहिवाशांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने सदर भागात टँकर द्वारा पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी आहे.

Podar School 2025

शेतकरी मंदिर परिसरात दर चार दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा होत असतो. त्यानुसार रविवारी रात्री पाणी सोडण्यात आले होते. मात्र पाईपलाईन फुटल्याने सहावा दिवस उजाडून देखील पाणी पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची सध्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. तर अनेकांना पाणी विकत आणून गरज भागवावी लागत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यापूर्वी देखील सदर परिसरात सिमेंट रस्त्याच्या कामादरम्यान सदर पाईपलाईन फुटली होती. रस्त्याच्या कामादरम्यान होणाऱ्या निष्काळजीपणामुळे रहिवाशांना वारंवार नाहक त्रास सोसावा लागत आहे. नगर परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी मंदिर परिसरातील वसाहतीत टँकर द्वारा पाणी पुरवठा करण्याची रहिवाशांची मागणी आहे.

Comments are closed.