सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवा गावात पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गावकर्यांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. झरी तालुक्यात पालकमंत्री यांचा दौरा झाला होता. त्यावेळी मांडवा गावातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश अभियंताला दिले होते. याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश गटविकास अधीकारी यांना दिले होते. पण आजपर्यंत कोणतेही उपाययोजना शासनाकडून करण्यात आली नाही ज्यामुळे मांडवा वासीयांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. ग्रामपंचायत मध्ये १४ वीत्त आयोगाचीे निधी शिल्लक आहे. हा निधी पाण्याकरिता वापरला जातो. मात्र या निधीचा सुद्धा वापर केल्या जात नसल्याचा आरोप गावकर्यांकडून केल्या जात आहे.
मांडवा येथून २ किमी अंतरावर असलेल्या पाटणाई या गावात पाणी असून तेथे बोअर मारून पाणी पुरवठा केल्यास मांडवा गावाची पाणी समस्या सुटू शकतो असेही शासनाला कळविण्यात आले. परंतु ग्रामपंचायत कडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केल्या जात आहे.
गावातील पाण्याची समस्या ४ दिवसात न सोडविल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “गुंड बजाओ पाणी दो” धरणे आंदोलनाचा इशारा तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला. त्यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत घुगुल, शंकर नैताम, बापूराव आत्राम, गंगाधर आत्राम, लक्ष्मण कोडापे सह महिला व गावकरी यांनी केला आहे.