पाण्यासाठी प्रगतीनगरवासीयांची नगर परिषदेवर धडक

पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशी संतप्त

0

निकेश जिलठे, वणी: वणीतील प्रगतीनगर येथील जय पेरसापेन होस्टेल ते जनता हायस्कूल पर्यंतच्या भागात गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक संतप्त होऊन त्यांनी मंगळवारी दिनांक 6 जूनला नगर पालिकेवर धडक दिली. यावेळी त्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्यअधिकारी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

प्रगतीनगरमधील जय पेरसापेन होस्टेल ते जनता हायस्कुल भागात गेल्या 15 दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. मंगळवारी पाणी सोडले गेले. मात्र या भागातील नळाला मात्र पाणी आलेच नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले. प्रगती नगर परिसरात 2005 मध्ये पाणी पुरवठा कऱण्यासाठी एक सबलाईल जोडली गेली होती. त्याद्वारे प्रगती नगर परिसराला पाणी पुरवठा करण्यात येतो. या फिडरलाईनवरून मध्ये छेडछाड केली. त्यामुळे या पाईपलाईनचे पाणी वळते झाल्याने या परिसरात पाणी समस्या निर्माण झाली आहे. अशी शंका या परिसरातील नागरिकांनी उपस्थित करत मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांची भेट घेतली. त्यांनी लगेच कर्मचारी पाठवून कामाला सुरूवात केली आहे.

2005 मध्ये टाकण्यात आलेल्या पाईपलाईनची तपासणी करून यात छेडछाड करण्यात आली का याचा शोध घ्यावा. तसेच यात तर चुकीच्या पद्धतीने काम कऱण्यात आले असल्यास दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे. यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू तुराणकर, पुरुषोत्तम आवारी, नरेंद्र सपाट, जयराम ताजने, अशोक इनामे, महेश पहापळे, इत्यादींसह परिसरातील रहिवाशी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.