दुमे नगर मधील रस्त्यावर साचले पाण्याचे तळे

जितेंद्र कोठारी, वणी: येथील दुमे नगर मधील ढुमे यांच्या घरापासून ते हनुमान मंदिर रोडवरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे पाऊस येताच या रस्त्यावर पाण्याचे डबके साचते. या मार्गावरूनच शाळा महाविद्यालयाला जावे लागते. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात शिकवणी वर्ग आहेत. त्यामुळे या मार्गावरून सायकल व दुचाकी वापरणा-यांचे प्रमाण अधिक आहे. डबके साचल्याने अनेक विद्यार्थ्यांचा छोटा अपघात देखील या मार्गावर रोजच होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ढुमे नगर येथील रहिवाशांनी नगर पालिकेला निवेदन सादर करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. निवेदन देते वेळी यादव जोगी, सागर जाधव, नगरसेवक खुशाल भोंगळे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी तसेच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना याबाबत निवेदन दिले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.