महिलेचा विनयभंग करून अपहरणाचा प्रयत्न, नेत्याला बेड्या

भालर रोडवरील घटना, वणीतील एका सुपरिचित व्यक्तीला अटक

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील भालर रोडवर एका 34 वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच तिच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. 13 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 6 ते 7 च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलिसांनी वेकोलित नोकरीवर असलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सुनील भाऊराव मोहीतकर (55) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी वेकोलितील कामगार युनियनचा नेता असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही 33 वर्षीय महिला असून ती वेकोलित नोकरीला आहे, ती सोमवारी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी मोपेडने भालर रोडवरून वणीला येत होती. दरम्यान आरोपीने त्याच्या हेरिअर कारने तिचा पाठलाग केला. त्याने महिलेच्या स्कूटरसमोर गाडी अडवून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी महिलेचा विनयभंग केला. तिने विरोध केला असता, आरोपीने चाकू काढून तिच्या मानेला लावत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अपहरणाचा प्रयत्न केला. महिलेच्या साहसामुळे ती तिथून निसटली आणि तिने तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवली. वणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध भा.दं.सं.च्या कलम 74, 75, 78, 87, 296, 352, 351(2), 351(3) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रियंका चौधरी करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments are closed.