सर…. आमची शाळा कधी सुरु होणार !

विद्यार्थ्यां शाळा सुरु होण्याच्या प्रतीक्षेत

0

सुशील ओझा, झरी: कोरोनाच्या महामारीत मागील वर्षी मार्च महिन्यात बंद झालेली आश्रमशाळा अध्यापही सुरू झाली नाही.आणि मागील दोन वर्षी परिक्षेविना सर्व विध्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र या वर्षी तरी शाळा सुरू व्हावी अशी विचारणा पालक वर्गातून सुरू आहे.झरी तालुक्यात चार शासकीय व दोन अनुदानित आश्रम शाळा असून या सर्व शाळा सध्या विध्यार्थीवीणा आहे. मात्र सर्व पालकांना आपल्या पाल्याची आश्रमशाळा सुरू व्हावी अशी विचारणा सुरू आहे.

आमचे मुलं शाळेत सुरक्षित राहते. जर शाळा सुरू झाली तर मुलांचे  शाळेविना अभ्यासाचे झालेले नुकसान भरून निघेल असा विश्वास पालक व्यक्त करतांना दिसत आहे .मात्र शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत निर्देश देत कोरोनाचा प्रसार होऊ नये या धर्तीवर शाळेने सर्व प्रोटोकाल पाळून शाळा सुरू करावे या बाबत स्पष्ट निर्देश दिले ,आणि दिनांक:-15 जुलै  पासून शाळा सुरू झाल्या.

मात्र आदिवासी विकास विभागाचे अध्यापही शाळा सुरू करण्याबाबत कुठलेही निर्देश नाही.कारण एका आश्रमशाळेत पन्नास च्या वर खेडे ,व पोडावरील विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि हे सर्व विद्यार्थी एकत्र शाळेत आल्यानंतर संक्रमणाची श्यक्यता नाकारता येत नाही. म्हणून शाळा ही विलंबाने सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे.

मात्र अदिवासी विभागाचे एक स्तुत्य उपक्रम हाती घेऊन शाळा बंद, पण शिक्षण सुरू !  या धर्तीवर  शिक्षणसेतु अभियान सुरू केले. आता आश्रमशाळेतील सर्व शिक्षक खेड्यात,पोडा वर अतिशय दुर्गम भागात  विध्यार्थ्यांच्या घरी जाऊन अध्यापन कार्य करीत आहे. या उपक्रमात तालुक्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळेचा समावेश आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.