बियरबार व देशी दारू दुकानाची तपासणी होणार का?

साठ्यातील दारू गायब होण्याची शक्यता

0

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमुळे तालुक्यातील सर्वच बियरबार व देशी दारू दुकानाला सील लावण्यात आले आहे. सिल लावण्यापूर्वी  अबकारी विभागाला शिल्लक असलेल्या दारू साठा व विक्रीची माहिती घेऊन सिल लावावे लागते. मात्र यात काही दुकानदारांनी चलाखी करून सेलिंग जास्त दाखवून उर्वरित दारूसाठा दुकानाच्या बाहेर व गोडाऊन मध्ये काढून ठेवतात. त्यानंतर तीच दारू जास्त दराने विक्री करून लाखो रुपयांची कमाई करतात.

लॉकडाऊन सुरू होऊन जवळपास दीड महिना होत असून अजूनही देशी व इंग्लिश दारूची विक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू होती. अबकारी विभाकडून बियरबार व देशी दारूच्या दुकानाला समोरच्या गेटला सील लावण्यात आले आहे. तर मागचे गेट खुले आहे. ज्यामुळे मागील गेटने दारूचे बंपर शिष्या तसेच थंडी बियर सुद्धा घरपोच मिळत आहे. तर काही दुकानातून सील लावलेले असून सुद्धा सील काढून दारूची विक्री केली जात होती.

दुकानाला सील लावल्यानंतर दारू दुकानदार दारूच्या पेट्या काढून कसा विक्री करतो असा प्रश्न उपस्थित होतो. ‘वणी बहुगुणी’च्या दणक्याने दोन दिवसांपासून बार व भट्टी मधून काढून ठेवलेली अवैद्य दारू विक्रीला आळा बसला आहे.  अबकारी व पोलीस विभागाच्या आशीर्वादाने मुकूटबन व झरी येथील काही देशी दारू दुकान व बियरबार मधील देशी इंग्लिश दारू व बियरचा साठा कमी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही बार चालक आपल्या बारच्या नेहमीच्या ग्राहकांना घरपोच दारूच्या बंपर शिष्या व बियर पोहचवत होते. यामध्ये अबकारी विभागाच्या कारभारावर संशयाची सूई येत आहे. जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन वणी व पांढरकवडा येथील अबकरीचे कर्मचारी सोडून यवतमाळ येथील अधिकारी व कर्मचारी पाठवून प्रत्येक देशी दारू दुकान व बियरबार मधील साठा चेक केल्यास यातील घबाड समोर येऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.