वादळ वाऱ्यामुळे झाड पडल्याने वाहतूक ठप्प
सुशील ओझा, झरी: तालुक्यात ५ मे रोजी सायंकाळी चार वाजता दरम्यान अचानक वादळवारा सुटला विजा चमकून रिमझिम पावसाला सुरुवात ही झाली. वादळ वाऱ्यासह वीज ही पडली त्यात मांगली येथील इसमही मृत्यू मुखी पडला होता. यातच मुकुटबन ते पिपरड मार्ग राजूर (गोटा) जाणाऱ्या मार्गाच्या मधोमध मोठे वृक्ष पडल्याने या मार्गावरील खेडेपड्यात जाणारे ऑटो, शेतकऱ्यांच्या शेती पीक नेणारे वाहन व मोटर सायकलने प्रवास करणाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत असून मोठा त्रास सहन करावे लागत आहे.
महिना लोटूनही संमधीत विभागाने या वृक्षाची विलेवाट लावली नाही ज्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे. वृक्ष पडल्याने ३ ते ४ गावचा संपर्क तुटल्यासारखे झाले आहे. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने पाठपुरावा करूनही समनधित विभाग कुंभकर्णी झोपेत दिसत आहे. अजूनही मुख्य मार्गावरील तुटून पडले झाड चालण्यात असमर्थ दिसत असून सदर झाडामुळे छोटया अपघातात वाढ झाली आहे. तरी रस्त्यावर पडलेले झाड उचलून मार्ग मोकळा करण्याची मागणी होत आहे.