रमजान ईद निमित्त आज दारु दुकाने राहणार बंद
परवानाधारक दुकांनासह बिअर शॉपी बंद ठेवण्याचे आदेश
जितेंद्र कोठारी, वणी : मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान ईद निमित्त मंगळवार 3 मे रोजी वणी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व दारु दुकाने व बियर बार बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे पत्राच्या अनुषंगाने ठाणेदार, वणी पो.स्टे. यांनी सर्व दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
मुस्लिम समाजाच्या वतीने मंगळवार 3 मे रोजी शहरी व ग्रामीण भागात रमजान ईद मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. या सणा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने ठराविक कालावधी करीता महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 142 (2) अनव्ये हे आदेश लागू करण्यात आले आहे. आदेशानुसार बंदच्या कालावधीत CL-3, FL-3, CL-2, FL-2, परवानाधारक तसेच बिअर शॉपी बंद ठेवण्यात येईल.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांविरुद्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये अटी व शर्तीचे भंगाची कार्यवाही करण्यात येईल. तसेच अनुज्ञप्ती परवाना कायम स्वरूपी रद्द करण्या बाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. असे आदेशात नमूद केले आहे.
Comments are closed.