बहुगुणी डेस्क, वणी: गप्पा गोष्टी सुरु असताना मध्ये पडणे एका महिलेला महागात पडते. एका महिलेला व तिच्या पतीला लाकडी दांड्यांना जबर मारहाण करण्यात आली. यात महिला जखमी झाली. झरी तालुक्यातील डोंगरगाव येथे गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण करणा-या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कमल माणिक मालवे (40) या डोंगरगाव ता. झरी येथील रहिवासी आहे. त्या त्यांच्या पतीसह गावात राहतात. गावातच आरोपी गणेश वामन पवार (28) व वामन विठोबा पवार (53) हे राहतात. गुरुवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास कमल या घरासमोरील रोडवर असलेल्या सार्वजनिक नळाजवळ उभ्या होत्या. तेव्हा त्या ठिकाणी गावातील काही लोक उभे होते. तिथेच कमलचा चुलत भाऊ प्रकाश जनार्धन पवार हा देखील होता.
तेव्हा तिथे उभे असलेले लोक प्रकाशला तू बाहेरगावी जाऊन मुक्काम करू नको. घरच्या बाईवर कुणी हात टाकेल, असे म्हणत होते. त्यामुळे कमलमध्ये गेल्या. याचा आरोपी गणेश व त्याचे वडील वामन यांना राग आला. ते कमलला तू मध्ये कशाला पडते. आमच्या भावाला आम्ही पाहून घेऊन असे म्हणाले. त्यांनी लाकडी दांड्याने व थापड, बुक्याने मारहाण केली. दरम्यान कमलचे पती मध्ये आले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. या भांडणात कमलच्या गळ्यातील मंगळसूत्र खाली पडले.
कमल यांनी मुकुटबन पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. बीएनएसच्या कलम 115(2) व 118(1) नुसार आरोपी गणेश वामन पवार व आरोपी वामन विठोबा पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.
Comments are closed.