बहुगुणी डेस्क, वणी: आर्थिक अडचणीच्या वेळी उधार दिलेले पैसे मागितल्याने एका महिलेला एका तरुणाने लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. यात महिला जखमी झाली. रविवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास पळसोनी येथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मारहाण झालेल्या महिला (70) या पळसोनी येथील रहिवासी असून त्या वणीत खासगी नोकरी करतात. त्याच्या घराशेजारी संदीप कवडू वानखेडे (30) हा राहतो. महिलेने संदीप याला काही दिवसांआधी 700 रुपये उसणे दिले होते. रविवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी महिलेने संदीपला उधार दिलेल्या पैशाबाबत विचारणा केली. तेव्हा संदीपने आज संध्याकाळी नक्की पैसे देतो असे सांगितले.
संध्याकाळी 7.45 वाजताच्या सुमारास संदीप महिलेच्या घरासमोर लोखंडी पाईप व प्लास्टिक पाईप घेऊन आला. त्याने तू वणीला कामाला जाताना जीवे मारणार अशी धमकी दिली. महिलेने पैसे मागितले असता त्याने त्याच्या हाताली नळआच्या लोखंडी पाईपने कमरेवर प्रहार केला तर दुस-या हातातील पाईपने पायाला मारहाण केली. या मारहाणीत महिला जखमी झाली.
मारहाणीमुळे महिलेला त्रास होऊ लागला. त्यामुळे दुस-या दिवशी महिलेने वणी पोलीस स्टेशन गाठत आरोपी संदीप विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी विरोधात बीएनएसच्या कलम 118(1) 351(2) 351(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.