बाजारात महिलेचा विनयभंग करून आरोपी फरार
विवेक तोटेवार, वणी : वणी शहरात सोमवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. झालेल्या घटनेची तक्रार पीडितेने वणी पोलिसात फिली आहे. तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मंगळवारी सायंकाळी पीडित महिला ही वणीतील सेवन स्टार मॉल मधून किराणा खरेदी करून घरी जायला निघाली. वाटेतच तुटी कमान जवळ वाहतूक ठप्प असल्याने गाडी थांबवून उभी होती. त्याच वेळी आरोपीने पीडितेच्या खांद्याला हाथ लावला. परंतु पिडितेला वाटले की अजानपणे धक्का लागला असावा. परंतु पुन्हा आरोपीने स्पर्श केला. त्यावेळी पीडितेने त्याला याबाबत विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करून घटनास्थळावरून पळ काढला.
पीडितेने सायंकाळी घडलेली घटना पतीला सांगितली, पतीने माहिती काढली असता आरोपी हा एका ज्वेलर्स मध्ये काम करतो अशी माहिती मिळाली. सायंकाळी आपल्या पतीबरोबर पीडिता जेव्हा ज्वेलर्स मध्ये गेले त्यावेळी दुकान बंद झाले होते. तेव्हा दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 9 वाजता दुकान बंद दिसले. त्यावेळी आरोपी राजू हा बाजूला बसला होता.
पीडितेच्या पतीने त्याला विचारणा केली की, तू अस का केलं तर आरोपी राजू ने पीडित महिलेच्या पतीला शिवीगाळ केली त्यानंतर वणी पोलिसात तक्रार देऊन आरोपी राजू यांचेवर 354, 504 नुसार गुन्हा नोंद केला आहे,पुढील तपास पोलीस पो उ नी विजयमाला रिठे करीत आहे