वणी तालुक्यातील दोन महिला शिक्षकांचा औरंगाबाद येथे सत्कार

0 518
वणी (रवि ढुमणे): राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत वणी तालुक्यातील दोन महिला शिक्षीकांनी नामांकन प्राप्त केल्याने दोघींचा बोधी ट्री एज्युकेशन सोसायटीचे तथा गौरव प्रतिष्टान चे वतीने सन्मानचिन्ह देऊन कुटुंबासमवेत सत्कार करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय आयोजित निबंध स्पर्धेत वणी तालुक्यातील सुकनेगाव जिल्हा परिषद शाळेतील वसुधा ढाकणे व पळसोनी जिल्हा परिषद शाळेतील हर्षदा चोपणे(कुर्ले) या दोन्ही महिला शिक्षिकांनी यश संपादन करीत नामांकन प्राप्त करीत जिल्ह्यात मानाचा तुरा रोवला आहे.
गेल्या 7 जानेवारीला बोधी ट्री एज्युकेशन सोसायटी तथा जीवन गौरव प्रतिष्ठान चे वतीने वसुधा ढाकणे व हर्षदा चोपणे यांचा सहकुटुंब शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.
Comments
Loading...