वणी तहसील कार्यालयात कामबंद आंदोलन

रेती माफियाचा नायब तहसिलदार व तलाठ्यावर हल्ला प्रकरणी आंदोलन

0

जब्बार चीनी, वणी: उमरखेड येथे रेती माफियाने नायब तहसिलदार व तलाठ्यावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याविरोधात वणीत आज बुधवारी दिनांक 27 जानेवारी रोजी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, मंडळ अधिकारी संघटना, तलाठी व कोतवाल संघटना सहभागी झाल्या होत्या. दरम्यान या संघटनेतर्फे एसडीओंना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

उमरखेड येथील नायब तहसीलदार उमरखेड वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर दि 23 जानेवारी रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान स्थानिक रेती माफिया अविनाश चव्हाण व त्याच्या सहका-यांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. परंतू दिनांक 26 जानेवारी पर्यंत संबंधीत रेतीमाफियास अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे रेती माफियास तात्काळ अटक करावी या मागणीसाठी वणीत महसूलच्या कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन पुकारले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रेती माफियावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली. दुपारी विविध मागण्याचे निवेदन एसडीओ यांना सादर करण्यात आले.

रेतीमाफियांवर कठोर कारवाई करून मकोका अंतर्गत अटक करावी, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे इत्यादी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसिलदार उपविभाग उपाध्यक्ष महेश रामगंडे , मंडळ अधिकारी संघटनेचे नितीन वांगडे, महसूल कर्मचारी संघटनेचे प्रवीण नागतुरे .यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

एसीवर 40 टक्यांपर्यंतची सूट, ऑफर केवळ रविवार पर्यंत

आकाश पेंदोर मृत्यू प्रकरणी वणीत कॅन्डल मार्च

Leave A Reply

Your email address will not be published.