वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कामगार महिलांना असभ्य वागणूक

निलगिरी बन इथल्या महिलांची वनविभागाच्या कार्यालयात धडक

0

रवि ढुमणे, वणी: मंदर जवळील निलगिरी बनात डाॅ बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीका आहे. इथं कामावर येणाऱ्या महिलांना वनरक्षकांकडून असभ्य वागणूक मिळत असल्याची तक्रार कामगार महिलांनी वनविभागाच्या कार्यालयात येवून दिली आहे. परिणामी येथील कामगार महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वणी तालुक्यातील शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या निलगिरी बनात रोपवाटीका तयार करण्यात आली आहे. शेकडो महिला मनरेगाच्या माध्यमातून येथे कामाला येतात. काही महिला तर वर्षानुवर्षे येथे कार्यरत आहेत. वनविभागाचे सहायक वनसंरक्षक राजकुमार पटवारी यांनी निलगिरी बनाचा कायापालट केला आहे. शहरातील लोक येथे सुट्टीच्या दिवशी पिकनिकला सुध्दा जात आहे. येथे येणाऱ्या लोकांना विविध सुविधा पटवारी यांनी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहे. येथे रोपवाटीका सुध्दा तयार करण्यात आली आहे.

या रोपवाटीकेत आजुबाजुच्या गावातील महिला कामगार कामावर येत आहे. याच रोपवाटीकेमध्ये वनरक्षक विजय पोटे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. विजय पोटे हे कामावर येणाऱ्या महिलांशी असभ्य वर्तन करून त्यांना अश्लील शिविगाळ करीत असल्याची तक्रार महिलांनी वनविभागाच्या पांढरकवडा येथील कार्यालयात केली तसंच वणी येथील कार्यालयात ठिय्या मांडला. प्रसंगी कामगार महिलांनी वनरक्षक विजय पोटे यांचे कारनामे सुध्दा कथन केले आहे.

रोपवाटीकेत काम करणारी मंदर येथील एक महिला कामगार इतर महिलांवर दबाव टाकून स्वत: शासनाची चाकरी करीत असल्याचा आव आणून वनरक्षक विजय पोटे यांना खोटी माहिती देते. एका कामगार महिलेला पुढे करून तिला सर्वाधिकार प्रदान केला आहे. वनविभागाचा कर्मचारी मनरेगाच्या कामावर येणाऱ्या कामगारांना एका महिलेला पुढे करून अश्लील भाषेत शिवीगाळ करतात, असा आरोप महिलांनी वनविभागाच्या कार्यालयात ठिय्या मांडून केला आहे.

उध्दट व अश्लील भाषा वापरून वनविभागाचा कर्मचारी मनमानी करीत रोपवाटीकेत येणाऱ्या कामगार महिलांना वेठीस धरत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे.  सोबतच कामावर न येणाऱ्या मजूरांची उपस्थिती दाखवून सुध्दा देयके काढण्याचा प्रकार येथील कर्मचारी करीत असल्याचे आरोप सुध्दा महिलांनी केले आहे.

याबाबत सहायक वनसंरक्षण राजकुमार पटवारी वनविभाग वणी यांना विचारणा केली असता असला प्रकार असल्याचे आत्ताच कळलं असून यापूर्वी कोणतीही तक्रार आली  नाही. त्यामुळे सदर प्रकाराची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे सांगितले आहे. एकूणच कामगार महिलांना अश्लील शिवीगाळ करीत कामावरून काढण्याची धमकी देणाऱ्या वनविभगाच्या वनरक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.