वणीकरांसाठी मेजवानी…. भव्य एलईडी वॉलवर वर्ल्ड कप फायनल

छ. शिवाजी महाराज चौकात भव्य एलईडी वॉलवर डीजे व लाईट्सच्या साथीने लाईव्ह मॅच.... तारेंद्र बोर्डे व कुणाल चोरडिया यांच्या संकल्पनेतून आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: रोमहर्षक मॅचमध्ये भारताने न्यूझिलंडचा धुव्वा उडवून वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. रविवारी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी वर्ल्डकपची फायनल मॅच होणार आहे. वणीकरांना या मॅचचा आनंद शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथे भव्य एलईडी वॉलवर घेता येणार आहे. माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व समाजसेवक कुणाल चोरडिया यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. मॅच दरम्यान डीजे साउंड सिस्टम, आकर्षक लाईट्स (रोशनाई) द्वारा व फटाक्याच्या आतषबाजीत सादरीकरण केले जाणार आहे.

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा
भारताने रोमहर्षक मॅचमध्ये विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा फक्त क्रीडाप्रेमींसाठीच नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी आनंदाचा आणि गौरवाचा क्षण आहे. हा ऐतिहासिक क्षण प्रत्येक वणीकरांनी जल्लोषात अनुभवावा यासाठी सार्वजनिकरित्या एलईडी वॉलवर या मॅचचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा.
– तारेंद्र बोर्डे, कुणाल चोरडिया

Comments are closed.