अवघे हजार रुपये न दिल्याने तरुणास स्टिलची बकेट, गुंडाने जबर मारहाण

मारहाणीत तरुण जखमी, तिघांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल

वणी बहुगुणी डेस्क: गाडीच्या भाड्याचे एक हजार रुपये न दिल्याने तिघांनी एका विवाहित तरुणास स्टिलची बकेट आणि स्टिलच्या गुंडाने बेदम मारहाण केली. यात तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या निवली येथे रविवारी रात्री 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी तीन आरोपींवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी नागेश अरुण वैद्य (31) हा मुळचा निवली येथील रहिवासी असून तो महिन्याभरापासून बेलदारपुरा वणी येथे राहतो. तो ट्रक चालक म्हणून काम करतो. नागेशच्या निवली येथील घरासमोर वैभव मोहितकर (30) व त्याचा भाऊ गौरव हेमंत मोहितकर (25) राहतो. दोन महिन्यापूर्वी नागेशच्या वडिलांनी वैभव मोहितकर यांची स्कॉर्पिओ गाडी 3500 रुपयांमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी भाड्याने घेतली होती. या गाडीने तो, त्याची पत्नी व त्याचे वडील बाहेरगावी गेले होते.

परत आल्यावर वैभव याने नागेशच्या वडिलांना गाडीचे भाडे अधिक झाल्याचे सांगून 1 हजार रुपये भाडं वाढवून मागितलं. त्यानंतर त्याने नागेशला बाकी असलेले पैसे मागणे सुरु केले. रविवारी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी निवली येथे गेला असता वैभव याने 1 हजार रुपयांबाबत नागेशजवळ विचारणा केली. त्यावर नागेशने दोन तीन दिवसात पैसे देतो असे सांगितले.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

रात्री 7.30 वाजताच्या सुमारास नागेश हा पत्नीसह त्याच्या बहिणीकडे जाण्यास निघाला होता. दरम्यान तिथे आरोपी गौरव हेमंत मोहितकर हा स्टिलची बकेट घेऊन नागेशजवळ आला. त्याच्या पाठोपाठ आरोपी वैभव देखील हातात स्टिलचा गुंड घेऊन आला. हेमंतने नागेशला लाथ मारून खाली पाडले व त्याच्या डोक्यावर स्टिलची बकेट मारली. त्यानंतर वैभवने नागेशला गुंडाने डोक्यावर प्रहार केला. मारहाणीत नागेशचे डोके फुटले व तो बेशुद्ध पडला.

त्यानंतर वैभवची आई देखील हातात काडी घेऊन आली. तिने काडीने नागेशला शिविगाळ करत मारहाण केली व धमकी देऊन निघून गेली. मारहाणीनंतर नागेशने पत्नीला सोबत घेऊन शिरपूर पोलीस स्टेशन गाठले व या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी वैभव हेमंत मोहितकर, गौरव हेमंत मोहीतकर व जयश्री हेमंत मोहितकर यांच्या विरोधात भादंविच्या कलम 323, 324, 34, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस शिपाई सुनिल दुबे करीत आहे.

हे देखील वाचा: 

प्रत्येक मोबाईल खरेदीवर स्मार्टवॉच, डिनरसेट किंवा एक आकर्षक गिफ्ट

पद्मावती नगरी येथे प्लॉट विकणे आहे

Comments are closed.