यवतमाळ अर्बन बँकेच्या संचालकाचा अनागोंदी कारभार

प्रशासनाकडे करण्यात आली तक्रार

0

वणी (रवि ढुमणे): वणी येथील यवतमाळ अर्बन बँकेच्या संचालकाने अत्यल्प किमतीची संपत्ती ज्यादा दराची दाखवीत बँकेकडून कर्ज काढून ते इतर खात्यावर हेराफेरी करून आपले पद वाचवित करोडो रुपयाची रक्कम विविध नावे तसेच संपत्ती वळती केल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र या तक्रारीला अद्याप कुठेही प्रसिद्धी देण्यात आली नाही. अत्यन्त कमी मोल असलेले भूखंड तारण करून कोट्यवधी रुपयांचे कर्ज पदरात पाडून घेतल्याने आता बँकेचे नियमित ग्राहक सुरक्षित आहे की नाही यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.

सहकार क्षेत्रात कमालीची उलाढाल करणारी बँक म्हणून नावारूपास आलेल्या यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत मागेल त्याला कर्ज अशी पद्धत होती. दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी ठेवी बँकेत जमा केल्या होत्या. मुदत ठेवी बहुसंख्य होत्या तर कापूस,धान्य या शेतमालाचा मोबदला सुद्धा व्यापारी याच बँकेतून देत होते. सध्या वणी शाखेत मनमानी कारभार सुरू असल्याची चर्चा जोरात आहे. इतकेच नव्हे तर या बँकेच्या संचालकाने तर एका संस्थेच्या (इंफा ट्रक्चर )नावावर कर्ज घेऊन ते कर्ज भागीदार असलेल्याच्या नावाने करून परत त्या रकमेला वळती दिशा देत केवळ संचालक पद वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. यात अत्यंत कमी मोल असलेल्या जमिनी ज्यादा दर लावून त्या तारण करीत करोडो रुपये उचल केली आहे.

स्वतःचे नाव मागे ठेऊन शहरापासून लांब असलेल्या गावातील मित्रांच्या मदतीने त्यांची नावे पुढे करीत भूखंड बँकेला तारण दिले आहेत. नियमित ग्राहकांना साधे कर्ज देण्यासाठी बँकेत येरझारा माराव्या लागतात मात्र इथे थेट संचालकाने अनागोंदी कारभार करीत बँकेचे दिवाळे काढण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार ग्राहकांनी प्रशासनाकडे केली असल्याची माहिती आहे. परंतु अद्याप या तक्रारीला कोणतीही प्रसिद्धी मिळाली नाही हे विशेष ! ज्या संस्थेची आर्थिक उलाढाल नाही त्या संस्थेला कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिलेच कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.