यवतमाळ अर्बन बँकेच्या वर्धापन दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

देश, समाजहिताचा विचार करणा-या पिढीची गरज - गजानन कासावार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: यवतमाळ अर्बन बँकेच्या वणी शाखेचा वर्धापनदिन वणी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे मुख्य अनुपालन अधिकारी श्रीधर कोहरे हे होते. बक्षीस वितरक म्हणून अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार हे उपस्थित होते. मंचावर बँकेचे वणी विभागीय अधिकारी भगत होते.

प्रास्ताविक शाखेचे शाखा व्यवस्थापक राऊळकर यांनी बँक, बँकेचे विविध योजना व विविध उपक्रम यांची माहिती दिली. त्यानंतर बक्षीस वितरक म्हणून बोलतांना कासावार यांनी या 21 व्या शतकातील युवकांच्या मन:स्थितीचे वर्णन करून करिअरच्या मागे धावताना स्वतःच्या हिताचाच विचार करून जगण्यापेक्षा देश व समाज हिताचा विचार आधी केला पाहिजे. अशा तरुण पिढीची देशाला आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अध्यक्षीय भाषणात श्रीधर कोहरे यांनी बँकेच्या विशेष उपक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अतिथीच्या हस्ते वणी शहरातील सर्व विद्यालयातील 10 व 12 च्या प्रथम तीन गुणवंतांचा भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचलन प्रमोद सप्रे यानी केले.

आभार मेघा नायगावकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखेतील कर्मचारी देवानंद जी चव्हाण, अर्जुन उरकुडे, अरविंद खाडे, संजय राजूरकर, जिवन चौधरी, पंकज नागपुरे, गणेश गोहने, दिलीप लोंढे, विलास पचारे, रंजीत कुमरे, महेश परचाके, संजय लिहितकर, संजय जिन्नावार व केतन लाभे यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.