येडसी बचत गटाच्या महिलांनी पकडली देशी दारु
परिसरातील छुप्या अवैध दारूविक्रीमुळे महिला त्रस्त
रफीक कनोजे मुकूटबन, झरी: मुकुटबन पोलीस ठाणे अंतर्गत सहा किमी अंतरावर असलेल्या येडसी येथील बचतगटाच्या महिलांनी अवैध व छुप्या पद्धतीने देशी दारु विकणाऱ्या विक्रेत्याला पकडुन पोलीसांच्या स्वाधीन केले.
मुकूटबन ठाणे अंतर्गत येणाऱ्या अनेक गावात अवैधरित्या दारू विकणारे चिल्लर विक्रेते फोफावले आहे. त्यामुळे महिला त्रस्त झाल्या होत्या. त्या चिल्लर विक्रेत्यांवर महिला लक्ष ठेवून होत्या. रामा बट्टावार (मुकूटबन वय ३६) हा गेल्या काही दिवसांपासून येडसी येथे लपुन दारु विकत होता. अखेर बचत गटाची महिलांनी रामा बट्टावार याला शविवारी दारू विकताना रंगेहात पकडले. त्याच्याकडून दोन खोक्यासहीत ४६ देशी दारूचे पोवे पकडण्यात आले. महिलांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
या मोहिमेत रून्दा राहुल भगत, लक्ष्मीबाई गागरे, भावनाबाई वराटे, छब्बु खडसे , भिवसेना दरवडे, निलीमा बोरकर, सुधा वराटे, सुवर्णा दरवडे, गोदावरी काकडे, अर्चना वराटे, नीलीमा काकडे, लहानुबाई बोरकर, निलीमा आगीरकार, गयाबाई बोरकर, दर्शना बोरकर व बचत गटाच्या महिला सहभागी होत्या. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शना खाली नैताम जमादार हे करीत आहे.