योग साधनेने जीवन आनंदी होते : तारेंद्र बोर्डेे

नगर पालिकेतर्फे योग दिन साजरा

0

विवेक तोटेवार, वणी:- योग हा आपल्या भारतीय जीवन पद्धतीचा पाया आहे. जी व्यक्ती या मार्गाने जाईल ती जीवनात आनंदी होईल. म्हणूनच आपल्या पंतप्रधानांनी या देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचा लाभ प्रत्येकांनी घ्यावा असे आवाहन वणी नगर परिषद अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केले आहे. बुधवारी नगर पालिकेच्या मैदानावर नगर पालिकेतर्फे योग दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी मुख्याधिकारी संदीपकुमार बोरकर, योग शिक्षक डॉ. मंगेश चिंचोलकर, डॉ. अतिक सय्यद, आस्कर प्रमुख्याने उपस्थित होते. योग शिक्षकांनी उपस्थित नगर परिषदचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, व नागरिकांना योगाचे महत्व समजावून सांगून योगदिनाच्या अनुषंगाने निर्धारित सर्व योग व प्राणायाम करवून घेतले. व नियमितपणे करण्याचा सल्ला दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जयंत सोनटक्के यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.