विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पठारपूर येथे एका युवा शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शनिवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. स्वप्नील संजय गारघाटे (30) रा. पठारपूर असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे नाव आहे. स्वप्नील हा सुशिक्षित होता. तो आपली वडिलोपार्जित 4 एकर शेती वाहत होता. त्यातूनच तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. स्वप्नील हा विवाहित होता. त्याला 3 वर्षाची मुलगी असल्याची माहिती आहे. त्याचे आईवडील हे रासा येथे राहत होते. तो शुक्रवारी रात्री घरी परतला नाही. मात्र आज शनिवारी दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास एका शेतक-याला स्वप्निल शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. स्वप्निलने रात्री गळफास घेतला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. स्वप्निलच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, पत्नी, 3 वर्षाची मुलगी आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शेतकरी आत्महत्याच्या घटना घडत असल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.