डोल डोंगरगाव येथे तरुणीची आत्महत्या

उपचारासाठी पैसे नसल्याने आत्महत्या ?

0

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यातील डोल डोंगरगाव येथील पोडात राहणाऱ्या एक तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. दुपारी 4 वाजताच्या सुमारास तिला वणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आत्महत्येच कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

अर्चना प्रकाश मालेकार (18) ही डोल डोंगरगाव येथील रहिवाशी होती. ती वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे 12 वीला शिकत होती. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे ती गावी परत आली. ती मायग्रेन आजाराने त्रस्त असल्याची माहिती मिळत आहे. तिला याबाबत उपचार करायचे होते. तिने दुपारी घरी कुणीही नसताना गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्याबरोबर तिच्या कुटुंबीयांनी तिला वणी येथे ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

उपचारासाठी पैसे नसल्याने आत्महत्या?
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अर्चनाचे आईवडील मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकतात. लॉकडाऊऩमुळे कॉलेज बंद झाल्याने ती गावी परत आली होती. मात्र गावी ती आजारी असायची. त्यावर तिला उपचार करायचा होता. मात्र लॉकडाऊनमुळे तिच्या कुटुंबीयांचा रोजगार गेला. त्यामुळे तिच्यावर उपचार करणे शक्य झाले नाही. याबाबत तिच्या आईवडीलांनी अनेकांकडे मदतीसाठी हात पुढे केल्याचीही माहिती मिळाली. मात्र मदत मिळू शकली नाही. अखेर अर्चनाने नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.