भर बाजारात केला तरुणीचा विनयभंग
विवेक तोटेवार, वणी: सोमवारी 11 फेब्रुवारीला बाजारात भाजी खरेदीसाठी गेलेल्या एका तरुणीचा हाथ पकडून व तिचा पाठलाग करून एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणी ही प्रकृती खराब असल्याने 20 फेब्रुवारीला वणी पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दिली आहे.
सरिता( बदललेले नाव) ही बाहेरगावी शिक्षण घेत असून ती रोज ये जा करते. 11 फेब्रुवारीला 10 वाजता नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेली. 6 वाजता सायंकाळी परत आल्यानंतर 8 वाजताच्या सुमारास दुचाकी वाहनाने भाजी आणण्याकरिता बाजारात गेली. यावेळी श्रीकांत ऋषी उलमाले वय 30 वर्ष रा. वेळाबाई हा तिची वाटच पाहत बसला होता. सरिता येताच श्रीकांत तिच्या जवळ आला व त्याने सरिताचा हाथ पकडून तिला शरीरसुखाची मागणी केली.
सरिताला हा प्रकार लक्षात येताच तिने आपल्या हाताची सोडवणूक करून पळ काढला. परंतु हा इसम तिचा पाठलाग करू लागला. श्रीकांतने पुन्हा पाठलाग करून अभद्र बोलू लागला हे सर्व एकूण सरीताला खूपच वाईट वाटले. ती घरी येऊन विचार करू लागली या घटनेचा तिच्या मनावर परिणाम झाला. तिची प्रकृतीही खराब झाली. पाच सहा दिवसानंतर तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.
तिच्या आईने हिंमत दाखवीत वणी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी श्रीकांत विरुद्ध कलम 354, 354 (अ), (2), 354 (ड) (2) , 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.