आवारी ट्युटोरिअल्सतर्फे परंपरा दिवस साजरा

विद्यार्थ्यांनो ध्येय निश्चित करा- प्रा. आवारी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. त्यासाठी अथक परिश्रमदेखील करतो. ध्येयहीन परिश्रम निरर्थक ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केले पाहिजे. असे प्रतिपादन प्रा. घनश्याम आवारी यांनी केले. आवारी ट्युटोरियल्सने परंपरा दिवस साजरा केला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी विचारपिठावर इंजि. परेश हस्ते, इंजि. मनोज निब्रड, प्रा. जीवन गाडगे उपस्थित होते.

पुढे बोलताना आवारी म्हणाले की, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा. सोबतच योग्य दिशेने प्रयत्न करीत राहावे. याप्रसंगी प्रा. परेश हस्ते, इंजि. मनोज निब्रड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. काही विद्यार्थ्यांनीदेखील महामानवांवर आपले विचार व्यक्त केले.

परंपरा दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान केली. कार्यक्रमाचे संचालन श्वेता मोहितकर आणि आयुषी फुलेवार या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैष्णवी येरणे यांनी केले. आभार सानिका धानकी हिने मानले.

 

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!