बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर युवा शक्तीचा मोर्चा
हजारों तरुणांचा मोर्चामध्ये सहभाग
विवेक तोटेवार, वणी: सुशिक्षित बेरोजगार युवक व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी युवा शक्ती संघटनेच्यावतीने मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी हजारों तरुण मोर्चामध्ये सहभागी झाले होते. युवा शक्ती संघटनेच्या वतीने वणीतील मुख्यमार्गाने ॲड. सूरज महारतळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
बेरोजगारी व शेतकऱ्यांचा प्रश्न हा नैसर्गिक किंवा जागतिक परिस्थितीतून उद्भवलेला नाही. सत्ताधारी लोकांच्या विकृत मानसिकतेतून तो निर्माण झाला आहेे, असा आरोप करण्यात आला. येथील शासकीय मैदानावर आयोजित सभेचे उद्घाटन ॲड. सूरज महारतळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विजय रामटेके, युवा शक्तीचे अध्यक्ष रवींद्र ढेंगळे, परिवर्तन शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष संदीप गोहोकार उपस्थित होते. .
युवकांचा सरकारी नोकऱ्यांत समावेश करा, युवकांना व्यवसायासाठी अर्थसाहाय्य मिळावे, शेतमालाला योग्य तो भाव मिळण्यासाठी व बेरोजगार युवकांना दरमहा रु. एक हजार बेकारी भत्ता द्या, अशी मागणी केली. एका शिष्ठमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले..