युवासेना कार्यकर्त्यांचा कंपनीच्या आवारात राडा, 21 जणांवर गुन्हा दाखल

गार्डला धक्काबुक्की केल्याचा आरोप, स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर

बहुगुणी डेस्क, वणी: निलजई येथील जीआरएन कंपनीच्या आवारात निवेदन देण्यास गेलेल्या शिवसेना (उबाठा) प्रणीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांसोबत कंपनीच्या कर्मचा-यांची गार्डची बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी एक गार्डला धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप कंपनीच्या मॅनेजरने केला असून या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर आम्ही केवळ स्थानिकांना रोजगारात संधी द्यावी अशा आषयाचे निवेदन देण्यासाठी गेलो असल्याचा दावा युवासेनेच्या आयुष ठाकरे यांनी केला आहे.

तक्रारीनुसार, पुवाडी रामचंद्र प्रसाद रामानायडू (50) हे जीआरएन कन्ट्रक्शन प्रा. लि. हैदराबाद, कार्यालय निलजई येथे मॅनेजर पदावर कार्यरत आहे. सोमवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी दु. 12.30 वाजताच्या सुमारास कंपनीच्या आवारात कारने 20 ते 25 लोक आलेत. त्यावेळी पुवाडी हे कंपनीच्या काही स्टाफ सोबत होते. यावेळी युवासेनेचे वणी विधानसभा समन्वयक आयुष रोहिदास ठाकरे (उबाठा) यांनी पुवाडी यांना तुमच्या कंपनीत किती स्थानिकांना रोजगार दिला आहे, स्थानिकांना कंपनीत रोजगार का दिला जात नाही, याबाबत विचारणा केली.

यावर पुवाडी यांनी कंपनीचे काम अद्याप सुरु नाही, जेव्हा काम सुरु होईल तेव्हा वेकोलिशी चर्चा करून स्थानिकांना कंपनीत रोजगार दिला जाईल, असे आश्वासन दिले. तेव्हा आयुष ठाकरे यांच्या सहका-यांनी पुवाडी यांना शिविगाळ केली. तर आयुष यांनी जर स्थानिकांना कामाला घेतले नाही तर कंपनीचे काम चालू देणार नाही, अशी धमकी दिली. यावेळी घटनास्थळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी कंपनीविरोधात नारेबाजी केली. दरम्यान एमएसएफचे सेक्युरिटी गार्ड घटनास्थळी आले. त्यातील एका गार्डला आयुष ठाकरे यांच्या सहका-यांनी धक्का बुक्की केली. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यानंतर मॅनेरजरने शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आयुष ठाकरे व त्यांचे 20 सहकारी अशा 21 जणांवर बीएनएसच्या कलम 352, 351(2), 191(2), 190, 189(2), 115(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

धक्काबुक्की झालेली नाही – आयुष ठाकरे
निलजई डीप (ओ.सी.) खाणीतील ओव्हर बर्डन काढण्याचे कंत्राट जीआरएन कंपनीला मिळाले आहे. कंपनीतील रोजगारांवर स्थानिकांचा पहिला हक्क आहे. मात्र येथे परप्रांतिय मजुरांना काम देणे सुरु आहे. हा स्थानिकांवर अन्याय आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यास गेलो होतो. या ठिकाणी कोणतीही धक्का बुक्की झाली नाही. असा दावा आयुष ठाकरे यांनी केला आहे.

Comments are closed.