तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड

0

रफीक कनोजे, झरी: झरी येथील तालुका भवनात ४ जानेवारीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा भवनेश्वरी देवी ह्यांनी तालुक्यातील सर्व अधीकार्यांसोबत विशेष आढावा सभा घेऊन विकास कामाचा आढावा घेतला होता. त्यानंतर माथार्जुन ग्रामपंचायतीला भेट देउन विकास कामाचा आढावा घेउन जिल्हाधीकारी यांनी विजय उइके यांना माथार्जुन गाव हागणदारी मुक्त करण्यास किती वेळ लागेल याची विचारणा केली होती. ह्यावर उइके यांनी २६ जानेवारी पर्यंत हागणदारी मुक्त करु असे सांगितले. परंतु आज रोजी तालुक्यातील अधिकतर गावे हागनदारी पासुन मुक्त करण्यासाठी तालुक्यातील सर्वच अधिकारी व कर्मचारी हागणदारी पासुन मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असताना दिसत आहे. प्रत्येक गावात गूड मार्निंग पथकच्या माध्यमातून उघड्यावर संडासला बसल्यास जिवनावर काय विपरीत परिणाम होतात ह्याविषयी मार्गदर्शन करताना दिसुन येत आहे. ह्यामध्ये आज शनिवारला सकाळी १० वाजता गुरुदेव सेवा भजन मंडळातर्फे मुकूटबन गावात विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून जन जागृती करण्यात आली.

गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण, दुय्यम गट विकास अधिकारी शिवाजी गवई, तहसीलदार गणेश राऊत यांचे सतत मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वच ग्रांपंचायतचे गामविकास अधिकारी व ग्रामसेवक आप आपल्या गावात संडास बांधकामासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे. अधिकतर गावे हागणदारी पासुन मुक्त करण्यासाठी स्वतः गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण व कर्मचारी हागणदारी पासुन मुक्त करण्यासाठी प्रत्येक गावात गूड मार्निंग पथकच्या माध्यमातून भल्या पहाटेच भेटी देत आहे. प्रत्येक गाव हागणदारी मुक्त झालाच पाहिजे यासाठी सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले आहे.

झरी तालुक्यातील किरण पावडे, उज्वला जगताप, विणु मेश्राम , सुवर्णा एकरे, सवीता गेडाम, लत्ता चिकराम, सुषमा गेडाम, कलावती मांडवकर ह्यांनी गुड मॉर्निंग पथक बनवुन हागनदारी मुक्त करण्यासाठी सकाळी उघड्यावर संडासला बसनार्याला झंडुचे फुल देउन त्यांचे स्वागत केले तसेच त्यांना उघड्यावर संडासला बसले तर आपले जिवन कसे धोक्यात आहे हे पटवुन दिले.

पाटण येथील सरपंच हललवार, मुकूटबन सरपंच शंकर लाकडे तालुक्यातील सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परीषद शिक्षक व रामलु आईटवार व माथार्जुन गावातील सरपंच बाबुलाल किनाके, ग्रा वि अ विजय उईके, उपसरपंच संतोष जंगीलवार, पो पाटील प्रकाश गेडाम, तंटा मुक्त समीती अध्यक्ष शरीफ शेख, ग्राम पंचायत सदस्य पुंजाराम मेश्राम राधाबाई किनाके फुलाबाई मेश्राम प्रियंका बासावार दादाराव मेश्राम कोबाई टेकाम गिजाबाई आत्राम प्रत्येक गावतील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, जिल्हा परीषद शाळातील शिक्षक व विद्यार्थी प्रत्ती दिवशी प्रभातफेर्या काढुन जनजागृती करीत आहे. त्यामुळे तहसीलदार गणेश राऊत, गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण, शिवाजी गवई, शिक्षणाधीकारी विजय हाडोळे, मुकूटबन ठाणेदार गुलाबराव वाघ तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम यांचे प्रयत्नांना यश मिळेल यात काही शंका नाही .

Leave A Reply

Your email address will not be published.