मांगली येथे ट्रक व मोटरसायकलचा अपघात

एकाचा मृत्यू तर दोघं गंभीर जखमी

0

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील मांगली जवळ दिनांक 10 ला सकाळी 10 वाजता रेती वाहून नेणारा ट्रक व मोटरसायकलचा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण यात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. मांगली पासून 3 किमीवर हा अपघात झाला आहे.

Podar School 2025

दिनकर निखार हे त्यांच्या दोन मुली ख़ुशी व भाविका यांच्या सोबत मोटारसायकलवर होते. त्यावेळी ट्रक चालक आपले वाहन मागे घेत होता. त्याच्या मागे निखार यांची मोटरसायक उभी होती. त्यामुळे त्यांनी ट्रक चालकाला ट्रक मागे घेण्यापासून रोखले. मात्र ट्रक चालकाने आपले वाहन मागे घेतले. त्यात मोटारसायकल ट्रकखाली आली. यात निखार आणि त्यांच्या दोन मुली वाहनाच्या चाकाखाली आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या अपघातात दिनकर यांची मुलगी खुशी हिचा जागीच मृत्यू झाला तर भाविका आणि दिनकर निखार गंभीर जखमी झालेत. या दोघांना आधी उपचारासाठी वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरला हलवण्यात आले. या सर्व घटनेचा तपास पाटण येथील ठाणेदार लष्करे, सोयाम व त्यांचे सहकारी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.