झरी तालुक्यात “पोलीस आपल्या गावी” उपक्रम

गावातील तंटे, तक्रारी सोडवण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट

0

सुशील ओझा, झरी: पोलिसांप्रती सर्वसामान्य जनतेच्या मनात एक भीती असते. त्यामुळे पोलिसांशी दोस्ती नको ना दुष्मनी असे मत बनले आहेत. पोलीस स्टेशन म्हटलं की चांगला व इज्जतदार व्यक्ती जाण्यास घाबरतो. तर गरीब जनताही तक्रार देण्यास घाबरतात. ज्यामुळे ग्रामीण भागात गुन्हेगारी, लहान मोठे झगडे, तंटे, शेतीचे वाद, जमिनीचे वाद, रस्त्याचे झगडे, जागेचे अतिक्रमण, सांडपाणी चे वाद मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

वरील झगडा व इतर भांडणाच्या वादा मध्ये पोलीस हे पैसेवाले धनाढ्य लोकांना साथ देऊन गरीब लोकांवर अन्याय करीत असल्याचा लोकांची भावना झाली आहे. ही भावना दूर करणे तसेच पोलीस आपला मित्र असून ते गोरगरीबापासून तर श्रीमंत लोकांसोबत सारखे असल्याचे उद्देशाने. “पोलीस आपल्या गावी” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमातून ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावातील तक्रारी सोडवण्यात येत आहे.

मुकुटबनचे ठाणेदार धनंजय जगदाळे यांनी पोलीस आपल्या गावी या उपक्रमातून सोनेगाव, तेजापूर, निमनी व घोंसा या गावात जाऊन गावातील प्रतिष्ठित, सरपंच, पोलीस पाटील तंटामुक्त समिती अध्यक्ष, यांना घेऊन गावात मिटींगच्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. त्यात बहुतांश तक्रारी वरील प्रमाणे होत्या तरी माझ्या परीने कायद्याच्या चाकोरीत राहून सर्वच्या तक्रारींचे निराकरण करणार असल्याचे ठाणेदार जगदाळे यानी सांगितले.

या व्यतिरिक्त कोणतीही तक्रार असल्यास कोणतीही भीती न बाळगता पोलीस स्टेशन ला येऊन कळवा असेही सांगितले. पोलिस आपला मित्र, भाऊच आहे त्यांच्यापासून काही घाबरायचे कारण नाही असे ठाणेदार बोलले. वरील चारही गावात ठाणेदार धनंजय जगदाळे यांचा सह पोलीस कर्मचारी अशोक नैताम, प्रवीण ताडकोकुलवार, सुलभ उईके, नीरज पातूरकर, राम गदडे, स्वप्नील बेलखेडे, रंजना सोयाम तर चारही गावातील प्रतिष्ठित सरपंच गजानन शेंडे, रविकांत जयस्वाल, संजय जयस्वाल, उमरे म्याडम, सरपंच बोरकर, विचू, धांडे,सरपंच सुभाष कुलसंगे , मनोहर कनाके, सुरेंद्र वैद्य, दिलीप वानखडे सचिन उपरे होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.