सुशील ओझा, झरी : ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होऊन साडेतीन वर्षांच्यावर झाले आहे. आदिवासी नगरपंचायत असल्याने विकासकामाकरिता शासनाचा निधी मोठ्या प्रमाणात येतो. मात्र नगरसेवकांना विश्वासात न घेता कामे करण्यात येत आहे. तसेच कामाचा दर्जाही सुमार आहे. याविरोधात नगरसेवकांसह नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले असून, नगराध्यक्षांचे पद रद्द करण्याची मागणी केली आहे.
