झरी तहसील कार्यालयावर युवक काँग्रेसची धडक

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या एका वर्षांपासून विविध समस्यानी शेतकरी, युवक व हमाल लोकांच्या विविध समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्याकरिता तालुका युवक काँगेस सरसावली असून याबाबत विविध समस्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले. आठ दिवसात मागण्या मंजूर न केल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत ४० हमाल असून २०१७-१८ साल मध्ये नाफेड मार्फत खरेदी मध्ये हमाल लोकांनी घाम गाळून हमाली केली. परंतु त्याचा ३ लाख ६७ हजार रुपयांचा मिळताना अजूनही मिळाला नाही. त्यामुळे हमाल अडचणीत सापडला आहे. तसेच २०१७-१८ मधील शेतकऱ्यांच्या लाखो रुपये नाफेड मार्फत खरेदी केलेल्या चण्याचे पैसे मिळाले नाही तर शेतकऱ्याचा माल ऑनलाइन नोंदणी केल्यावर मार्केट यार्डात नेण्यात आले परंतु त्या मालाची मोजणी झाली नाही. तसेच त्या शेतकऱ्यांना मेसेज आला नाही अश्या शेतकऱ्यांना शासनाकडून प्रति क्विंटल १००० रुपये अनुदान देण्याचे ठरले होते परंतु अजूनपर्यंत असे ३०० ते ४०० शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे.

१३ नोव्हेंबर पासून तूर खरेदी सुरू झाली. परंतु दीड महिन्याचा कालावधी लोटूनही तूर विकलेल्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत विकलेल्या मालाची रक्कम मिळाली नाही.यावर्षीचा तुरीचा सिजन सुरू झाला असून तूर निघणे सुरू झाले आहे तरी खाजगी मार्केटचा दर कमी असून नाफेड मार्फत केंद्र त्वरित सुरू करावी. तसेच मुकुटबन येथे एम पी बिर्ला सिमेंट कंपनी सुरू झाली असून सदर कंपनीत बाहेर राज्यातील विविध रिक्त पदे स्थानिक तरुणांना वगळून भरल्या जात असून बाहेर राज्यातील लोकांना नोकरीत स्थान देत असल्याची ओरड होत असून तालुक्यातील तरुण बेरोजगार युवक पात्र नाही का? असाही संतप्त प्रश्न निवेदनातून करण्यात आला आहे.

वरील सर्व समस्यांचे निवेदन तहसीलदार सह इतरही कार्यालयातही निवेदन देण्यात आले असून वरील समस्याचे निराकरण आठ दिवसात न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा कृ उ बाजार समितीचे सभापती संदीप बुरेवार, सरपंच तथा कृ उ बाजार समितीचे माजी संचालक निलेश येल्टीवार, प स उपसभापती नागोराव उरवते, राहुल धांडेकर, हरिदास गुर्जलवार, प्रभाकर मंदावार सह कार्यकर्त्यांनी दिला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.