भास्कर राऊत, मारेगाव: वेगाव बोटोणी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर यांना एका युवकाने दगड मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. नेमका दगड कोणत्या कारणाने मारला हे जरी स्पष्ट झाले नसले तरी यामध्ये अनिल देरकर यांना जबर मर लागला असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेचे वेगाव बोटोणी गटाचे जि. प. सदस्य अनिल देरकर आज शुक्रवारी दि. 5 नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान वेगाव येथे रस्त्याच्या बाजूला उभे होते. त्यावेळी एक दुचाकीस्वार मारेगाव वरून वेगाव येथे येत होता. अनिल देरकर यांनी त्याला हात जोडून नमस्कार केला. पण दुचाकीस्वाराने त्यांना शिवीगाळ करीत सरळ दगड उचलून मारला. आणि घटनास्थळावरून पोबारा केला.
अचानक झालेल्या या हल्ल्याने अनिल देरकर गोंधळून गेले. अनिल देरकर यांना तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांच्या डोक्याला व कानाला जास्त मार असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
अनिल देरकर यांना कोणी आणि का मारले हे अजूनही स्पष्ट नसून याविरोधात मारेगाव पोलीस ठाण्यात बातमी लिहिपर्यंत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. परंतु एका जि.प. सदस्यावर अचानक झालेल्या हमल्याने मारेगाव तालुक्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढविल्या जात आहेत.
हे देखील वाचा:
Comments are closed.