झरी येथे झुणका भाकर केंद्राचे उद्घाटन

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातून विविध कामांसाठी शहरात येणाऱ्या गोरगरीब गरजूंसाठी झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती सभापती लता आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

झरी येथे पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषी कार्यालय, बँक, न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, शिक्षण विभाग, शाळा, महाविद्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, पशू वैद्यकीय दवाखाना, खरेदी विक्री कार्यालय, बालकल्याण एकात्मिक प्रकल्प कार्यालय आहे.

कार्यालयीन कामाकरिता व शिक्षणाकरिता येणाऱ्या गोरगरीब तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना या केंद्रामुळे स्वस्त व चवदार झुणका भाकर मिळणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यवतमाळ व पंचायत समिती झरी यांच्या प्रयत्नाने आसरा महिला बचत गट पांढरकवडा(लहान) द्वारा संचालित अन्नपूर्णा झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आले.

झुणका भाकर केंद्राचे उदघाटनादरम्यान उपसभापती नागोराव उरवते, तहसीलदार रामचंद्र खिरेकर, भाजप तालुकाध्यक्ष अनिल पोटे, आमदार प्रतिनिधी अनिल पावडे, सह गटविकास अधिकारी शिवाजी गवई, माजी पं. स. सदस्य सुरेश मानकर, नगराध्यक्ष राजू मोहितकार, ठाणेदार शिवाजी लष्करे, सरपंच रमेश हललवार, सरपंच नीलेश येलटीवार, प्रा. श्याम बोदकुरवार, किरण पावडे, विजया गेडाम आदी उपस्थित होते..

Leave A Reply

Your email address will not be published.