‘या’ पाकिस्तानी गायिकेनं गायलेलं मराठी गाणं सध्या होतंय व्हायरल

फेसबुकवर अपलोड केलं गायिकेनं गाणं

0

मुंबई: कला आणि संगिताला भाषा आणि सीमेचं बंधन नसतं हे पुन्हा एकदा दिसून आलंय. सध्या नाझिया अमिन मोहम्मद ही पाकिस्तानी गायिका सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. तिने एक मराठी गाणं गायल्यानं ती चर्चेत आली आहे. तिनं गायलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

नाझिया ही कराचीमध्ये राहते. प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं ‘जोगवा’ या सिनेमातील ‘जीव दंगला रंगला’ हे गाणं तिनं गायलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्री व्हावी, या उद्देशाने तिने हे गाणं गायलं आहे. ‘भारतातील आणि जगभरातील मराठी रसिकांसाठी उर्दू भाषिक पाकिस्तानींकडून ही सप्रेम भेट’, असं म्हणत तिनं हा व्हिडीओ अपलोड केला आहे.

खरंतर पाकिस्तानी गायिकेने मराठी गाणं इतकं साफाईदारपणे गाणं आश्चर्याचीच गोष्ट आहे. त्यामुळेच या व्हिडिओचं मोठं कौतुक केलं जात आहे. नाझियाने आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड केलाय. तुम्हीही एकदा नाझियानं गायलेलं हे मराठी गाणं ऐका तुमचा देखील यावर विश्वास बसणार नाही की हे गाणं एका अमराठी गायिकेनं गायलंय.
गाणं ऐकण्यासाठी खाली क्लिक करा…

Leave A Reply

Your email address will not be published.