”पुकारता चला हू मैं”ऑनलाईन संगीत रजनी रविवारी

कलोतीनगर, अमरावती येथील सिंफनी स्टुडिओचे आयोजन

0

बहुगुणी डेस्क, अमरावतीः  सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्ट अमरावती आणि सिंफनी स्टुडिओ एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. “पुकारता चला हू मैं” या शीर्षकाखाली निवडक गीतांची ऑनलाईन मैफल रविवार दिनांक 2 मे रोजी रात्री 8.३० वाजता होणार आहे. ही मैफल सिंफनी स्टुडिओचे फेसबूक पेज व सिंफनी स्टुडिओचे युट्यूब चॅनल (सिंफनी ट्यून्स) वर लाईव्ह असणार आहे. सर्व रसिकांना या कार्यक्रमाचा नि:शुल्क आस्वाद घेता येईल.

लिंक सिफनी ट्यून्सची खाली दिली आहे.

Podar School

https://www.youtube.com/channel/UCIVPV5cwA1HEWlgT763WgdA

 

या मैफलीत अरविंद व्यास, संजय व्यवहारे, जयंत वाणे, गुरूमूर्ती चावली, डॉ. नयना दापूरकर, डॉ. गुणवंत डहाणे, पल्लवी राऊत हे गायन करणार आहेत. संगीत संयोजन सुनित बोरकर यांचं आहे. पियानोची साथ सचिन गुडे यांची आहे. तबल्याची साथ विशाल पांडे करणार आहेत.

इंडिया वॉइस फेस्ट मध्ये दोन कॅटेगरीमध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, आणि रेक्स कर्मवीर ग्लोबल फैलोशिप आणि कर्मवीर चक्र अवार्डने सम्मानित तसेच जगविख्यात सुप्रसिद्ध अनाउंसर हरीश भिमानी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नासीर खान हे कार्यक्रमाचे निवेदन करतील हे विशेष. याचं दर्जेदार चित्रिकरण अमिन गुडे यांनी केलं आहे.

जुना बायपास रोडवरील कलोतीनगरातील सिंफनी स्टुडिओत या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. नव्या कलावंतांनासुद्धा विविध उपक्रमांत संधी देण्याचा प्रयत्न असल्याचं सिंफनीचे अध्यक्ष सचिन गुडे यांनी कळविले आहे.

हेदेखील वाचा

पालकमंत्री संदीपान भुमरे यांची कोविड सेंटरला भेट

हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

 

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!