शेतकऱ्यांना शेतीचे नकाशे तलाठ्यांनी द्यावे

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतीचे नकाशे तलाठ्या कडून मिळत होते. मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ते नकाशे तलाठी संघटनेच्या निर्णयामुळे भूमी अभीलेख कार्यालयातून घ्यावे असा अलिखित आदेश आला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले असुन नकाशा मिळविन्यासाठी शेतकऱ्याना तालुक्याच्या ठिकाणी यायला २५ ते ३० किमीची पायपिट करावी लागत आहे. सोबतच त्यांना आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे. शेतीचे नकाशे आधीसारखेच तलाठ्यांमार्फत देण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे.

मारेगाव तालुक्यात शंभरच्या वर गावे असुन साधारणतः ७०% जनता शेतीवर अवलंबून आहे. पूर्वीपासून शेतकऱ्यांना शेतीचे नकाशे गावचा तलाठी देत असत. कारण भुमी अभिलेख मधून शेतकऱ्याच्या सुविधेसाठी नकाशाची एक सत्य प्रत तलाठीयांच्या कडे नियमानुसार असायची. परंतु काही महिन्यापूर्वी तलाठी संघटनेने नकाशे भूमी अभिलेख मार्फत देण्यात यावे यासाठी निर्णय घेतला. त्यामुळे तलाठी आता शेतीचे नकाशे देत नाही. त्यामुळे़ शेतकऱ्यांना आता शेतीचे नकाशे मिळविन्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांचा वेळ, पैसा जात आहे.

नकाशासाठी तालुक्यातुन २५ ते ३० किमी यावे लागते. पहिलेच शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना आणि भुमीअभीलेख कार्यालयात नकाशे मिळविन्यासाठी वेळ, श्रम वाया जात आहे. त्यामुळे पूर्वीसारखेच शेतीचे नकाशे तलाठ्यानी गावातच देन्याची मागणी शेतकरीवर्ग करीत आहे. शेतकर्यांना होणाऱ्या त्रासा बद्दल जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून शेतकर्यांना न्याय देन्याच काम करावे असेही शेतकर्याॉंचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.