वणी पोलिस ठाण्यात विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

परिसरात एकच खळबळ, संतप्त नागरिकांची पोलीस ठाणे परिसरात गर्दी

0
विवेक तोटेवर वणी: एका इसमाने पोलीस ठाण्यात विष पिऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे वणीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सदर इसम मनोरुग्ण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे तर दुसऱ्या बाजूने पोलिसांनी तक्रार न घेता मारहाण केली तसेच मानसिक त्रास दिल्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे म्हणणे आहे.
काल मंगळवारी दुपारी विरुर तालुका कोरपना येथील रहिवाशी असलेला मारोती बोंशा सुरपण हा इसम वणी पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीबाबत तक्रार दाखल करण्यास आला होता. परंतू तो मनोरुग्ण वाटत असल्याने त्याची तक्रार घेण्यात आली नाही व त्याला डी बी रूममध्ये बसविण्यात आले. असे पोलिसांचे म्हणणे आहे. याच वेळी निराश झालेल्या मारोतीने विधारी औषध प्राषण केले. पोलिसांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी मारोतीला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
आज बुधवारी मारोतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही बाब मारोतीच्या नातेवाईकांना व वणीतील काही लोकांना कळताच ते आक्रमक झाले. मारोती याच्या मृत शरीर जेव्हा वणीत आणण्यात आले तेव्हा बघ्यांची एकाच गर्दी  केली होती. पोलिसांना जमावाला पंगविण्यासाठी बाळाचा वापर करावा लागला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस ठाण्यात विषाची बॉटल आली कुठून?

या प्रकरणामुऴे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मारोतीने पोलीस ठाण्यात विष घेतले. त्यामुळे तिथे विष आले कसे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. काहींच्या मते हे विष जप्तीचे असून तिथेच ठेवलेले होते. तर पोलिसांच्या मते मारोती आधीच विष घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. जर हे विष जप्तीतील असेल तर या बेजबाबदारपणाला कारणीभूत कोण असा प्रश्न विचारला जातोय.
तर सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल धुर्वे यांनी पोलिसांना मारोतीला तक्रार न घेता उलट मारहाण केली व तक्रार घेत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी तिथेच ठेवलेले जप्तीतील विष प्राषण केल्याचा आरोप केलाय. तर वणीतच मारोतीचा मृत्यू झाल्याचा आरोप मारोतीच्या नातेवाईकांनी केलाय.  याबाबत ठाणेदारांवर ऍक्ट्रोसिटी ऍक्टनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ठाणेदारांवर निलंबणाची कार्यवाही करावी अशी मागणी बिरसा ब्रिगेड तर्फे करण्यात आली आहे

वणी बहुगुणीशी बोलताना ठाणेदार वैभव जाधव म्हणाले की, संबधित इसम हा विषारी औषध बाहेरूनच घेऊन आला होता. तो मनोरुग्ण असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला ठाण्याबाहेर काढले होते. परंतु नजरचुकीने तो केव्हा ठाण्याच्या आवारात आला हे दिसले नाही. पोलिसांनी त्याला मारहाण केली नाही.

या प्रकरणामुळे वणीत एकच खळबळ उडाली असून प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.