प्रियकराच्या प्रेमाला चांगलाच बहर, प्रेयसी गर्भवती होताच हात वर

लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने अत्याचार, अल्पवयीन मुलगी 6 महिन्यांची गर्भवती

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालु्क्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकऱणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पीडिता ही सहा महिन्यांची गर्भवती असून आरोपीने हात झटकल्याने पीडितेने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.

Podar School 2025

अल्पवयीन पीडिता ही मारेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवाशी आहे. तर आरोपी स्वप्निल अय्या टेकाम (20) हा मेंडणी ता. मारेगाव येथील रहिवाशी असून तो परिसरात ऑटो चालवतो. पीडिता व आरोपीचे प्रेमसंबंध होते. यातून पीडिता व आरोपींमध्ये अनेकदा शारीरिक संबंध आले. सहा महिन्याआधी दिनांक 2 डिसेंबर 2021 रोजी रात्री आरोपीने पीडितेला एका शेतात भेटायला बोलावले होते. ती शेतात जाताच आरोपी स्वप्रील अय्या टेकाम हा देखील शेतात पोहोचला. तिथे आरोपीने पीडितेशी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यानंतर काही दिवसांनी पीडितेला गर्भधारणा झाल्याचे कळले. तिने आरोपीला ती एक महिन्याची गर्भवती असल्याचे कळवले. मात्र आरोपीने तो मी नव्हेच अशी भूमिका घेत या गर्भधारणेशी माझा काही एक संबंध नसल्याचे सांगत हात झटकले. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास मोटारसायकलने उडवून देईल अशी धमकीही आरोपीने पीडितेला दिली.

आज किंवा उद्या आरोपी जबाबदारी घेईल या आशेवर पीडिता राहिली. दरम्यान ती सहा महिन्याची गर्भवती राहिली. अखेर याविरोधात तिने तक्रार देण्याचे ठरवले व तिने मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी स्वप्निल अय्या टेकाम विरोधात भादंविच्या कलम 376 , 376 (2) (N), 506 व पोक्सोच्या (बाल लैगिक संरक्षण कायदा) च्या 4,6 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोउनि सावंत करीत आहे.

Comments are closed.