वांजरीच्या जगन्नाथ बाबा विद्यालयात लसीकरण

0 217

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील वांजरी येथील जगन्नाथ बाबा विद्यालयात सोमवारी विद्यार्थ्यांना गोवर- रुबेला लसीकरण करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणात आरोग्य विभागाने सदर कार्यक्रम आयोजित केला होता.

आरोग्य परिचारिका एस. एम. कोमेजवार, अंगणवाडी सेविका सिंधू खाडे, आशासेविका विनीता तेलंग यांच्या मदतीने लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका ताई पिंपळकर, नोडल शिक्षक अभय राजुलवार आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

* डॉ. बाबासाहेबांना वाहिली आदरांजली *
जगन्नाथ बाबा विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन झाला. याप्रसंगी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे दिली.

750 X 422 PODDAR
Comments
Loading...