सर्पदंशाने मार्डी येथे विवाहितेचा मृत्यू

0 432

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील एका विवाहित महिलेला सर्पदंश झाला. तिला उपचारासाठी असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

प्रेमलता प्रमोद चंदनखेडे (33) असे सर्पदंशाने मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. सकाळच्या सुमारास ती तिच्या घरी पाणी भरत असताना घरातील एका कोप-यात एक विषारी साप दबा धरुन होता. पाणी भरताना अचानक तिला विषारी सापाने दंश केला. सर्पदंश झाल्याचे माहिती होताच तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्नालयात उपचारासाठी नेले. मात्र वाटेतच किन्हाळा गावाजवळ तिचा मृत्यू झाला.

मृत महिलेमागे पती व सासू, सासरे असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

25 मार्च अंतिम तारीख

Comments
Loading...