युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0 700

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील टॅक्टर चालक युवकाने मंगळवारच्या रात्री गावठाण्यातील पळसाच्या झाडाला पाणीभरन्याच्या दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

प्राप्त माहिती नुसार गोंडबुरांडा येथील राजु सुर्यभान आत्राम,वय ३० वर्ष, यांनी गावात असलेल्या पळसाच्या झाडाला पाणी भरण्याच्या दोराने गळफास लाऊन आत्महत्या घटना मंगळवार, दि.६ मार्चच्या रात्री ११ वाजता घडल्याचा अंदाज आहे. सकाळी ही घटना उघडकीस येताच सात वाजता घटनेबाबत मृतकाचे वडील सुर्यभान चंडकु आत्राम यांनी मारेगाव पोलीस स्टेशनला घटनेची तक्रार दिली.

मारेगावचे ठाणेदार अमोल माळवे यांचे मार्गदर्शनाखाली जमादार चांदेकर तपास करीत आहे. आत्महत्येच कारण अद्याप समजू शकले नाही.

750 X 422 PODDAR
Comments
Loading...