ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात सत्तरच्या वर शेतक-यांना किटकनाशकाच्या फवारणीतुन विषबाधा झाली असुन हे शेतकरी विविध रुग्णालयात उपचार घेत आहे. या शेतक-यांना खासगी रुग्णालयात सुमारे 50 हजार ते 70 हजार रूपयांपर्यंत खर्च आला आहे. मात्र विषबाधित शेतकऱ्यांना फक्त 5 हजार हजार रुपयांचा धनादेश दिल्याने शेतक-यांचे डोळे पांढरे झाले आहेत.
मारेगाव तालुक्यातील टाकळखेडा येथील शेतकरी अशोक किसन आंबाडे या शेतकऱ्या कडे स्वतः च्या नावावर पाच एकर शेती आहे. त्या शेतकऱ्याने दि.२३ सप्टेंबर २०१७ ला आपल्या शेतात पोलो नावाच्या कीटकनाशकाची फवारणी केली होती. फवारणी करताना त्यांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यांना प्रथम मारेगाव ग्रामीण रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर त्यांना पुढील उपचाराकरीता वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना त्यांना उपचारासाठी सुमारे 70 हजारांचा खर्च आला. उपचाराचा खर्च आणि औषधीची बिलं त्यांनी सादरही केली.
फवारणी दरम्यान मृत झालेल्या आणि गंभीर असलेल्या शेतक-यांना शासनातर्फे मदत जाहीर झाली. जेव्हा अशोक आंबाडे यांच्याकडे शासनाची मदत पोहोचली तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले. कारण त्यांना शासनाकडून केवळ 5 हजारांचा धनादेश मिळाला. शासनाकडून सध्या शेतक-यांची क्रुर थट्टा सुरू आहे. अनेक विषबाधीत मृत शेतक-यांना शासनाची मदतही मिळाली नाही. तसेच आता फवारणी दरम्यान गंभीर असलेल्या शेतक-यांना केवळ पाच हजारांची मदत देऊन शासनानं शेतक-याची थट्टा केली आहे. याप्रकरणी परिसरात संताप व्यक्त होत असून शेतक-यांना योग्य ती मदत केली नाही तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा प्रवीण खानजोडे, अजय धोबे, विकेश पानघाटे, रुद्रा कुचनकर, सिद्दीक रंगरेज, अखिल सातोकर इ. शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिला आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post
Next Post